मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह ट्विट : भाजपा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात


मुंबई : भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारीया (jiten gajaria) आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याचा गजारीया यांच्यावर आरोप आहे. पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला मात्र चौकशी केल्यानंतर काही वेळाने त्याला सोडण्यात आले आहे. या दरम्यान भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.

या कारणास्तव निर्माण झाला वाद
गजारीया यांनी केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे (rashmi thackeray) यांना ‘मराठी राबडीदेवी’, असे म्हटले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला. याच प्रकरणात गुरुवारी गजारीया यांना ताब्यात घेत, त्यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे. यावेळी त्यांच्या वकिलाने गजारिया यांच्या ट्विटचे समर्थन केले. तसेच, मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे म्हणून ट्विट करता कामा नये, असा कायदा नाही. हे ट्विट अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या चौकटीत राहून केले आहे.


अशा खेळ्या हे तर त्यांचे राजकारणच : निलेश गोर्‍हे
जितेन (jiten gajaria) हे एक राजकारणातील हस्तक वा प्यादे असून त्याने त्याच्या राजा व वजिराच्या भूमिकेनुसार हे ट्वीट केले असावे. कारण भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा व पदाधिकार्‍यांनी ट्वीटचे समर्थन केले आहे. भाजपमध्ये अनेकप्रकारे शिक्षण, प्रशिक्षण केले जाते. केंद्रातील अपयशावरून लक्ष उडवायला अशा खेळ्या करणे हे त्यांचे राजकारणच आहे. ज्यांना सायबर क्राईममधील सुरक्षिततेसाठी करायचे असेल, त्यांनी केंद्राच्या 66 अ कायद्याला परिणामकारक करावे. शक्ती कायद्याच्या धर्तीवर केंद्राने सायबर क्राईमचा समावेश करावा, असे विधान परीषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे म्हणाल्या.

ट्रोलर पाटर्भ तयार : मनीषा कायंदे
रश्मी ठाकरे (rashmi thackeray) यांचा राजकारणाशी थेट संबंध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणे, अपमान करणे अशी ट्रोलरची पार्टी तयार झाली आहे. भाजप आता भारतीय ट्रोल पार्टी झाली आहे. अशा विकृत लोकांवर कठोर कारवाई करायला हवी. महिलांविषयी गरळ ओकणार्‍या भाजपच्या आयटी सेलवर कायमची बंदी घातली पाहिजे, असे शिवसेना आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !